sanjay-nirupam.jpg 
मुंबई

लॉकडाउन विरोधात मुंबईत हॉटेल मालक उतरले रस्त्यावर

दीनानाथ परब

मुंबईत लॉकडाउन होण्याची शक्यता आणि हॉटेल उद्योगावर लादलेल्या निर्बंधांविरोधात मुंबईत आज हॉटेल मालकांनी निदर्शने केली. मुंबईत सध्या दररोज पाज हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हॉटेल्सवर काही निर्बंध टाकले आहेत. पहिल्या लॉकडाउनमध्ये नुकसानीचा सामना करणाऱ्या हॉटेल चालकांनी रात्रीच्या निर्बंधांविरोधात आवाज उठवला आहे. जोगेश्वरी पश्चिम आणि ओशिवरामधील हॉटेल चालकांनी शांततामय मार्गाने निदर्शने केली. 

रात्री आठ नंतर हॉटेल बंद म्हणजे व्यवसाय बंद असे त्यांनी निदर्शने  फलकांवर लिहिले होते. नो लॉकडाउन प्लीज, आमच्या नोकऱ्या वाचवा अशा घोषणा हॉटेल चालकांनी फलकावर लिहिल्या होत्या. हॉटेल क्षेत्रात काम करणारे पुरुष आणि महिला दोघेही या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. 

लॉकडाउनला विरोध करणारे संजय निरुपम हॉटेल चालकांचे शिष्टमंडळ घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्यात गेले होते. रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत हॉटेल्स, सिनेमा हॉल बंद असतात. फक्त पार्सलना परवानगी दिलेली आहे. 

"मिशन बिगिन अगेन अंतर्गत आम्हाला सर्वात शेवटी परवानगी देण्यात आली होती. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात रेस्टॉरन्टसना परवानगी देण्यात आली होती. मर्यादीत ग्राहकसंख्येसह ही परवानगी दिली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येलाही अशाच प्रकारचे निर्बंध घातले. रात्री ११ पर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरन्टस बंद करण्याचे निर्देश दिले होते. अनेक हॉटेल मालकांनी आपल्या कर्मचारी संख्येत कपात केली, अजूनही व्यवसाय पूर्णपणे रुळावर आलेला नाही. सरळ बंद करण्याऐवजी सोशल डिस्टन्सिंग अधिक कठोर करावे" असे दादर मधल्या एका हॉटेल मालकाने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT