waze.jpg 
मुंबई

सचिन वाझेंबद्दल नवीन गौप्यस्फोट, वसुलीसाठी होती A, B, C वर्गवारी 

दीनानाथ परब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला हॉटेल, पब, रेस्टॉरंटसकडून १०० कोटींची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप पत्रातून केला आहे. हे पत्र माध्यमांच्या हाती लागल्यापासून ठाकरे सरकारवर बोचरी टीका सुरु आहे. भाजपा, मनसे, वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात आता एक नवी माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांनी मागणी करण्याच्या दोन महिने आधीपासूनच सचिन वाझेंनी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोशिएशनमधील (आहार) सूत्रांच्या हवाल्याने मिड डे या दैनिकाने हा गौप्यस्फोट केला आहे. (Mumbai Hoteliers recount horror tales after ex top cop Param Bir Singhs allegations against Anil Deshmukh)

पैसे गोळा करण्यासाठी वाझेंनी हॉटेल उद्योगाची तीन वर्गामध्ये विभागणी केली होती, असा खुलासाही सूत्रांनी केला. पत्राध्ये नमूद केलय त्यानुसार, वाझेंनी देशमुखांची ज्ञानेश्वरी निवासस्थानी फेब्रुवारी अखेरीस भेट घेतली होती. पत्रामध्ये सिंह यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्याबरोबर झालेला चॅट सुद्धा जोडला आहे. वाझेंनी देशमुख यांची भेट घेण्यामागचं कारण तुला सांगितलं का? असं परमबीर सिंह यांनी संजय पाटील यांना चॅटमध्ये विचारलं. त्यावर त्यांनी, मुंबईत १७५० आस्थापने आहेत, त्यांनी प्रत्येक आस्थापनामागे ३ लाख रुपये जमा करावेत, म्हणजे ४० ते ५० कोटी जमा होतील असं वाझेंनी आपल्याला सांगितल्याचं पाटील म्हणाले. (Mumbai Hoteliers recount horror tales after ex top cop Param Bir Singhs allegations against Anil Deshmukh)

पत्रात नमूद केल्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात वाझे आणि देशमुखांमध्ये झालेल्या एका बैठकीला देशमुख यांचे खासगी सचिव पालांडे सुद्धा उपस्थित होते. हॉटेल मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे हे डिसेंबर २०२० पासूनच धाड टाकण्याची धमकी देऊन बार मालकांकडून पैसे वसूल करत होते. 

फोन करुन वाझे काय सांगायचे?
"क्रॉफर्ड मार्केटमधील CIU च्या कार्यालयात बसून वाझे आपलं दुकान चालवत होते. वाझे हे हॉटेल, पब, बार व्यावसायिकांना फोन करुन त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचे. त्या बदल्यात पोलिसांची समाजसेवा शाखा आपल्या हॉटेल, पब, बारवर धाड टाकणार नाही असे आश्वासन द्यायचे. आम्ही कुठल्याही कायदेशीर अडचणीत येणार नाही, याची सुद्धा ते हमी द्यायचे" असे एका हॉटेल मालकाने सांगितले.

काय होती ए, बी, सी वर्गवारी? 
"समाजसेवा शाखेच्या धाडीपासून संरक्षण म्हणून ही रक्कम घेतली जायची. लॉकडाउन नंतर व्यवसाय सुरु झाल्यापासून हे सर्व सुरु झालं. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात ठेवल्याशिवाय वझे हे सर्व करत होते, यावर विश्वास ठेवणं अवघड आहे" असं वांद्रयातील एका नावाजलेल्या हॉटेल मालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. वाझे यांनी ए,बी आणि सी असे तीन वर्ग केले होते. ए वर्गाकडून महिना दोन लाख, बी कडून महिना दीड लाख आणि सी कडून महिना एक लाख रुपये वसूल करायचे, असे एका बार मालकाने सांगितले. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: भारताच्या माजी क्रिकेटरचे रोहित पवारांवर गंभीर आरोप, क्रिकेट जगतात खळबळ! नेमकं प्रकरण काय?

सुधा चंद्रन यांच्या अंगात खरंच देवी आलेली की, नाटक होतं? खरं कारण आलं समोर

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा तालिब एन्काउंटरमध्ये ठार! UP पोलीसांची कारवाई, असा घडला चकमकीचा थरार

Gold Rate Today : नवीन वर्षात सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी महाग! सर्वसामान्यांना झटका, गुंतवणूकदार खुश; आजचे ताजे भाव पाहा

ताडोबातील खाण प्रकल्पाला अखेर मंजुरी; राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांचा विरोध डावलत सरकारचा निर्णय...

SCROLL FOR NEXT