मुंबई

Navi Mumbai: IAS अधिकाऱ्याकडून दोघांना मारहाण; UPIमधून बळजबरीने पैसे काढून घेतल्याचा आरोप

इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीतील दोघा कर्मचाऱ्यांना घरात डांबून बेदम मारहाण केल्याप्रकरणी मंत्रालयातील उपसचिव अमन मित्तल आणि त्यांचे भाऊ देवेष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीतील दोघा कर्मचाऱ्यांना घरात डांबून बेदम मारहाण केल्याप्रकरणी मंत्रालयातील उपसचिव अमन मित्तल आणि त्यांचे भाऊ देवेष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता या दोघांनी कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोनमधून यूपीआयद्वारे जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अमन मित्तल यांच्यावर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ॲड. स्वाती फडतरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. याबाबत मुखमंत्र्यांकडे पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीत काम करणारे कर्मचारी सागर मांढरे, भूषण गुजर यांनी वकील ॲड. स्वाती फडतरे यांच्यासह गुरुवारी ऐरोली येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी अमन मित्तल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कशा प्रकारे मारहाण केली हे त्यांनी सांगितले. इंटरनेट कंपनीकडून पैसे मिळतील हे सांगूनही अमन मित्तल यांनी यूपीआयद्वारे देवेष मित्तल यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचा आरोप भूषण गुजर यांनी केला.

तक्रार दाखल करून घेण्यास गेल्यानंतर पोलिसांनी ऐकून घेतल्याचा आरोप सागर मांढरे यांनी केला. दरम्यान, हा दरोड्याचाच प्रकार असल्याने मित्तल यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रबाळे पोलिसांकडे केल्याची माहिती ॲड. फडतरे यांनी केली.(Latest Marathi News)

अमन मित्तल यांच्या घणसोली सेक्टर ६ येथील सदनिकेत इंटरनेट सेवा सुरू करण्यावरून ३० डिसेंबर रोजी हा वाद झाला होता. मित्तल यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मांढरे आणि गुजर यांनी केला आहे; तर या दोघांनीच आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मित्तल यांनी केला आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीनुसार दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही बाजूकडील तक्रारदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT