Crime News esakal
मुंबई

Crime News : आयसीएमआर या शासकीय संस्थेत कार्यरत शास्त्रज्ञास जीवे मारण्याची धमकी

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर या शासकीय संस्थेत कार्यरत एका शास्त्रज्ञाला ईमेलद्वारे दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर या शासकीय संस्थेत कार्यरत एका शास्त्रज्ञाला ईमेलद्वारे दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मुंबई - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर या शासकीय संस्थेत कार्यरत एका 35 वर्षीय शास्त्रज्ञाला ईमेलद्वारे दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात गुन्हा नोंदवून भोईवाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ई मेल पाठवणार्‍याने ईमेलसोबत दोन लोकांचा शिरच्छेद करतानाचे दोन व्हिडिओही जोडले आहेत. पवईच्या रहिवासी असलेल्या शास्त्रज्ञाकडून 50 हजार रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत शास्त्रज्ञाला धमकीचा ईमेल 11 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला होता. दुपारच्या सुमारास ईमेल तपासल्यानंतर शास्त्रज्ञाने पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना ईमेलची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली. भोईवाडा पोलिसांनी तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम 385, 506 (2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66अन्वये अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांना दिलेल्या जबानीत, शास्त्रज्ञाने सांगितले की ईमेलशी दोन संलग्न व्हिडिओं पाठवण्यात आले. ज्यामध्ये दोन लोकांचा धारदार शस्त्राने शिरच्छेद केला जात असल्याचे होते आणि जर मागणी पूर्ण केली नाही. तर माझा सुध्दा असाच शिरच्छेद करण्याची धमकी होतो. ईमेलमध्ये शास्त्रज्ञाला 24 तासात 50,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आली दिली होती, त्यानंतर तो त्याच्याशी पुन्हा संपर्क साधणार नाही. परंतु चाकूने त्याचा शिरच्छेद करेल असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले होते. भोईवाडा पोलीस या प्रकरणात ईमेल कोणत्या लोकेशन वरून पाठवण्यात आले याचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT