IIT Mumbai sakal
मुंबई

Mumbai IIT : आयआयटी मुंबई विद्यार्थी कथित आत्महत्या प्रकरणी "मानसिक शविच्छेदन" मानसोपचार तज्ञांकडून मागणी

सरकारने सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मानसिक आरोग्य तज्ञाची एक टीम नियुक्त करून दर्शनच्या मृत्यूचे मानसिक शवविच्छेदन अनिवार्य केले जावे अशी मागणी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शेट्टी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आयआयटी मुंबई विद्यार्थी दर्शन सोळंकी कथित आत्महत्या प्रकरणी "मानसिक शविच्छेदन" ( Psychiatric autopsy) करण्याची मानसोपचार तज्ञांकडून मागणी केली जात आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे दर्शन सोलंकी यांच्या मृत्यूचे मनोवैज्ञानिक शवविच्छेदन करण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.

नॅशनल ज्युडिशियल अकादमी तसेच महाराष्ट्र ज्युडिशियल अकादमी आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शेट्टी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे.यापूर्वी मनोवैज्ञानिक शवविच्छेदन डॉ. शेट्टीनी यापूर्वी केले आहे

सरकारने सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मानसिक आरोग्य तज्ञाची एक टीम नियुक्त करून दर्शनच्या मृत्यूचे मानसिक शवविच्छेदन अनिवार्य केले जावे अशी मागणी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शेट्टी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

डॉ. शेट्टी यांनी त्यांच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, राजकीय वादामुळे शैक्षणिक संस्थांमधील वातावरण बिघडू शकते आणि विद्यार्थ्यांना धार्मिक आणि जातीय आधारावर विभागले जाऊ शकते. या पार्श्भूमीवर आत्महत्येचा तपास जात, धर्म, विचारधारा वगळून वैज्ञानिक साधनांनी केला पाहिजे. , मनोवैज्ञानिक शवविच्छेदनमुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चुकीच्या अफवांना पूर्णविराम लागेल आणि मृत्यूकडेचे खरे कारण समजू शकेल असे डॉक्टर शेट्टी यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे.

मनोवैज्ञानिक शवविच्छेदन म्हणजे काय?

मनोवैज्ञानिक शवविच्छेदनाच्या प्रक्रियेमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तसेच मित्रांच्या निकटवर्तीयांच्या मुलाखती घेण्यात येतात. त्यातून आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या उपस्थितीद्वारे मृत व्यक्तीबद्दल सर्व उपलब्ध माहिती गोळा करण्यात येत असते. मृत व्यक्तीच्या आरोग्य संदर्भात नोंदी, न्यायवैद्यक तपासणी आणि इतर संबंधित नोंदींमधूनही माहिती संकलित केली जाते. यामुळे आत्महत्येची संपूर्ण प्रक्रिया अचूकपणे समजण्यास मदत होते. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT