मुंबई

मुंबईची हवा पडली 'आजारी'; कशामुळे होतेय मुंबईची हवा इतकी विषारी ?

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईच्या तापमानात घट झाली असतानाच मुंबईची हवाही आजारी पडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी मुंबईत 311 एक्यूआय हवा गुणवत्ता पातळी नोंदविली गेली, जी 'अत्यंत वाईट ' प्रकारात मोडते. तर काही भागात हवेची गुणवत्ता अगदी खालच्या पातळीवर पोहोचली आहे.

प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबई उपनगराचे किमान तापमान 17 अंश सेल्सिअस, तर शहराचे तापमान 19.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. कमाल तापमानही उपनगरात 31.3 आणि शहरात 29.4 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवणाऱ्या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (एसएएफएआर) चे संचालक गुफरन बॅग म्हणाले की, सध्या मुंबईत अतिशय थंड वातावरण आहे, त्यामुळे हवेतील कण वातावरणात साचून राहतात. हवेत उपस्थित प्रदूषक बाहेर पडण्यास सक्षम नसतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खराब आहे.

हवा गुणवत्ता - 

  • मालाड - 342 एक्यूआय
  • कुलाबा - 334 एक्यूआय
  • चेंबूर - 309 एक्यूआय
  • अंधेरी - 308 एक्यूआय
  • बीकेसी - 302 एक्यूआय
  • बोरिवली - 301 एक्यूआय
  • माझगाव - 297 एक्यूआय
  • वरळी - 190 एक्यूआय
  • भांडुप - 145 एक्यूआय

हवा गुणवत्ता मोजमाप - 

  • 0 ते 50 एक्यूआय - चांगले
  • 51 ते 100 एक्यूआय - समाधानकारक 
  • 101 ते 200 एक्यूआय - मध्यम
  • 201 ते 300 एक्यूआय - खराब
  • 301 ते 400 एक्यूआय - अत्यंत वाईट
  • 400 च्या वर - गंभीर

mumbai important news air quality of city recorded dangerous read what are reasons behind it

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT