crime esakal
मुंबई

Mumbai Crime : आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा एनसीबीकडून पर्दाफाश; म्होरक्यासह दोघे अटकेत

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतून 4.5 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. 30 एप्रिल रोजी अमली पदार्थाच्या जप्तीनंतर सिंडिकेटचा म्होरक्या आयजीएन अन्सारीसह पीएस वीर आणि रोहन या अन्य दोन आरोपींना भिवंडीत अटक करण्यात आली.

या छाप्यात 36 लाख रुपये रोख आणि 7.8 लाख रुपये किमतीचे सोनेही जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीला माहिती मिळाली होती की, ठाणे परिसरातून हे सिंडिकेट कार्यरत असून ते इतर राज्यांतून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात पुरवले जात होते. या माहितीच्या आधारे गुप्तचरांनी छापे टाकण्यास सुरुवात केली.

रविवारी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ठाण्यातील भिवंडी परिसरात सापळा रचून पीएस वीर आणि रोहन के या दोघांना ड्रग्ज खरेदी करताना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून एनसीबीने दोन किलो मेफेड्रोन जप्त केले. चौकशीदरम्यान, आरोपींनी आयजीएन अन्सारी नावाच्या त्यांच्या अमली पदार्थ पुरवठादाराची माहिती उघड केली. अन्सारीला पकडण्यासाठी एनसीबीचे पथक तातडीने त्याच्या भिवंडीतील घरी पोहोचले आणि त्याला पकडले. एनसीबीच्या पथकाला अन्सारीच्या घरातून 36 लाख रुपये रोख आणि 7.8 लाख रुपये किमतीचे 147 ग्रॅम सोने सापडले, जे जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT