Pets
Pets Sakal
मुंबई

Mumbai News : पाळीव प्राण्यांना अंत्यविधीची सुविधा देणारे मुंबई देशातील पहिले शहर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, ‌श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मुंबई महापालिकेने मालाडमध्ये उपलब्ध केली आहे. नैसर्गिक वायू आधारीत दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे.

ही सेवा विनामूल्य असून मुंबईतील प्राणिमित्र आणि नागरिक यांनी लहान पाळीव प्राण्यांचा शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी होण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी - उत्तर विभाग कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगरात पाळीव लहान प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहन सुविधा करण्यात आली आहे. नैसर्गिक वायू आधारित दहन तंत्रज्ञानाची ही पद्धती शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक देखील आहे.

ही सुविधा वापरासाठी खुली करण्याचा छोटेखानी सोहळा शुक्रवारी मालाड येथे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते पार पडला.

महानगरपालिकेचे उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त शैलेश पेठे, सहायक महाव्यवस्थापक डॉ. सचिन कुलकर्णी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज माने, डॉ. योगेश वानखेडे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था आहे. नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित हे दहन होणार असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही.

पीएनजीवर आधारीत देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, अशी माहिती उपआयुक्त संजोग कबरे यांनी यावेळी दिली. अनेक वर्षांपासून प्राणिमित्रांकडून मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त दहन सुविधेसाठी मागणी होत होती, त्याची पूर्तता या माध्यमातून झाली आहे.

या दहन व्यवस्थेसाठी इंधन स्वरुपात वायू पुरवठ्याची सुविधा ही महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, लवकरच याठिकाणी लहान पाळीव प्राण्यांचे शवागार (मॉर्च्युरी) ची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

लहान पाळीव प्राणी दहन सुविधा

मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगरात कॅटल पाँड कार्यालय येथे पालिकेने लहान पाळीव प्राण्यांचे मरणोत्तर शास्त्रोक्त व पर्यावरण पूरक पद्धतीने दहन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा मृत लहान प्राणी जसे पाळीव व भटके श्वान, मांजरी इत्यादींच्या दहनासाठी उपलब्ध राहणार आहे.

ही सेवा विनामूल्य पुरवली जाणार आहे. दहन व्यवस्थेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. या दहन व्यवस्थेची क्षमता ५० किलो प्रतितास एवढी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT