Mumbai  esakal
मुंबई

Mumbai : चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचे स्पष्ट; 'त्या' प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : यावर्षी मार्चमध्ये वरळी सिफेसवर भरधाव वेगाने मोटरगाडीने दिलेल्या धडकेत एका कॉर्पोरेट कंपनीच्या महिला सीईओ राजलक्ष्मी राजकृष्णन या महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघाता प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

फॉरेन्सिक अहवाल

पोलिसांनी आरोपपत्रात कलिना फॉरेन्सिक लॅबचा अहवाल जोडला आहे. ज्यामध्ये सुमेर मर्चंटच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी 137mg/100ml असल्याचे नमूद केले आहे .मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 नुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अल्कोहोलची पातळी 30mg/100ml पेक्षा जास्त असल्यास ' मद्याच्या नशेच्या अमलात असल्याचे मानले जाते. पोलिसांनी आरोपीच्या कारची तपासणी केल्यानंतर मर्चंट 95-100 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत असल्याचे तपासात दिसून आले.

घटनाक्रम

19 मार्च रोजी सकाळी वरळी सिफेसवर भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. राजलक्ष्मी राजकृष्णन असे महिलेचे नाव होते. या अपघातात गाडीचा चालकही जखमी झाला होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 23 वर्षीय सुमेर मर्चंट या चालकाला अटक केली होती. सुमेरच्या घरी शनिवारी 18 मार्चला रात्री मित्रांची पार्टी झाली होती. त्यानंतर तो मित्राला सोडायला शिवाजी पार्क येथे गेला असता त्याने हा अपघात केल्याचे तपासात उघडकीस आले.

आयटी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी

राजलक्ष्मी राजकृष्णन मुंबईतील आय टी कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होत्या.त्या माटुंगा पूर्वेकडील बालाजी गार्डन टॉवर येथील सातव्या मजल्यावर राहतात, त्यांनी अलीकडेच टाटा मॅरेथॉनमध्येही भाग घेतला होता, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडल्या.

वरळी सी फेसवर चालत जात असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार राजलक्ष्मी यांना धडक देत दुभाजकावर आदळली. या धडकेत त्या दूरवर फेकल्या गेल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT