उपमुख्यमंत्री फडणवीस sakal
मुंबई

Mumbai : देवेंद्र फडणवीस साहेब आपले स्वागत ,येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सोबत घेवून या ...

कल्याण मध्ये काँग्रेसची बॅनरबाजी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कल्याण मध्ये सभेला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये काँग्रेसच्या वतीने बॅनर लावण्यात आले असून यावर "मिसिंग पालकमंत्री" असे लिहीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संदेश देऊ केला आहे. "देवेंद्र फडणवीस साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत...

पण येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना आपल्या सोबत घेवून या...जेणेकरून भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री पहायला मिळतील. या बॅनर वरील संदेश साऱ्यांचेच लक्ष वेधत आहे.

ऐतिहासिक कल्याण नगरीत सोमवारी 19 जूनला जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहरत. या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लावलेले हे बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत. आजच शिवसेना शिंदे गटाचा मेळावा कल्याण मध्ये असून काही कामांचे लोकार्पण देखील होणार आहे. त्यातच शहरात रात्री हे बॅनर लागले असून ते शिंदे गटाला देखील आव्हान देणारे आहेत.

शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे पालकमंत्री झाल्यापासून नागरिकांच्या भेटीला किती आले. ठाणे जिल्ह्यातील किती नागरिकांना आपले पालकमंत्री कोण आहेत हे माहीत आहे ? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. नागरिकांना तरी आमचे पालकमंत्री समजू दे याच हेतूने कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या वतीने बॅनर लावण्यात आल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

काय लिहलंय बॅनरवर...

देवेंद्र फडणवीस साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत आहे.आपल्या सरकार मध्ये सहभागी असलेले पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई यांना आपल्या सोबत घेऊन या जेणेकरून भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री बघायला मिळेल Missing माननीय श्री शंभूराज देसाई पालकमंत्री ठाणे जिल्हा यांना आपण पाहिलं का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT