Court Sakal
मुंबई

छातीवर वार करुन दोघांची केली होती हत्या; आरोपीस दुहेरी जन्मठेप

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने संजय पाटील याला दुहेरी जन्मठेप आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण मधील देवकर बंधूंच्या हत्येच्या आरोपात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने संजय पाटील याला दुहेरी जन्मठेप आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यातील दुसरा आरोपी मनोज खांडगे याचे खटला सुरु असतानाच निधन झाले होते. डिसेंबर 2010 साली जुन्या वादातून अशोक, कृष्णा आणि रामदास देवकर या बंधूंवर संजय व मनोज यांनी धारदार शस्त्राने वार केले होते. यामध्ये अशोक व कृष्णा यांचा मृत्यु झाला होता तर रामदास हे उपचारानंतर बरे झाले.

कल्याण पश्चिमेतील रामदासवाडी परिसरात 3 डिसेंबरला रात्रीच्या वेळेस हे हत्याकांड घडले होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर अशोक (वय 40), कृष्णा (वय 32) व रामदास (वय 42) हे तिघे भाऊ गप्पा मारीत बसले होते. यादरम्यान तेथे संजय पाटील हा तेथे आला जुन्या भांडणाच्या वादातून त्याने अशोक व कृष्णा यांच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर वार करुन हत्या केली. रामदास यांच्यावरही वार करीत त्यांना जखमी केले होते.

याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात 4 डिसेंबर 2010 ला गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये तत्कालीन पोलिस निरिक्षक एन. बानकर व आर. आव्हाड यांनी गुन्ह्याचा तपास करीत यामध्ये संजय पाटील (वय 38) व मनोज खांडगे (वय 37) यांना तत्काळ अटक केली होती.

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात या हत्येप्रकरणी खटला सुरु होता. सरकारी वकील म्हणून अश्विनी पाटील यांनी युक्तीवाद केला. जिल्हा न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी सबळ व भक्कम पुराव्याच्या आधारे संजय याला दोन भावांचे खुन आणि एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या आरोपाखाली दुहेरी जन्मठेप व 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी कारावासाच्या कालावधीत कोणत्याही माफीसाठी पात्र राहणार नाही असा निकालही पांडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयातच फजिती? राहुल गांधींच्या SIR याचिकेत १४ त्रुटी, २२० रुपयेही कमी; सुनावणीच रखडली!

Solapur Road Accident: बहिणीला भेटून गावाकडे परतत होते; अज्ञात वाहनाची धडक, ४८ वर्षीय भावाचा मृत्यू

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, पाऊस परतणार?; कोकणात पावसाचा अंदाज

Pune Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर; पुणे जिल्ह्यातील १,७१८ शेतकऱ्यांना लाभ

Pune News: पुण्यात मोठी पाणी कपात! दर गुरुवारी नळाला पाणी येणार नाही; १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT