mumbai Sakal
मुंबई

Mumbai : भिवंडीतील चोरांचा कल्याण रेल्वे स्थानक अड्डा; कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

या तक्रारीनंतर शुक्रवारी संध्याकाळी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे राहणारा अल्पवयीन कष्टकरी पुणे येथे जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात संध्याकाळच्या वेळेत आला होता.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भिवंडीत राहणाऱ्या चोरट्यांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आपला अड्डा बनविले आहे. कल्याण हे जंक्शन असल्याने या ठिकाणी सातत्याने प्रवाशांची वर्दळ सुरु असते. येथील प्रवाशांचे पाकीट, मोबाईल, सोनसाखळी चोरुन चोरटे आपली गुजरान करत असल्याची बाब लोहमार्ग पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या आधारे प्रवाशांचे मोबाईल चोरुन नेणाऱ्या दोघा चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी पकडले असून ते दोघे ही भिवंडी येथील राहणारे आहेत. सुरज कुमार जब्बर मोरया (वय 190 आणि समीर नसरुद्दीन खान बाई (वय 24) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी सांगितले, बिहार येथे राहणारा धीरजकुमार पीतिझिया हा कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी बिहार येथे जाणारी एक्सप्रेस पकडण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता आला होता.

एक्सप्रेस येण्यासाठी उशीर असल्याने धीरज कुमारला बसल्या जागी डुलकी लागली. त्याच्या खिशात मोबाईल होता. यावेळी चोरट्याने त्याच्या झोपेचा गैरफायदा घेऊन त्याच्या खिशातील मोबाईल काढून घेत, त्याने पळ काढला. जाग आल्यावर धीरजकुमार यांना आपला मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या तक्रारीनंतर शुक्रवारी संध्याकाळी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे राहणारा अल्पवयीन कष्टकरी पुणे येथे जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात संध्याकाळच्या वेळेत आला होता. एक्सप्रेसला उशीर असल्याने तो कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांच्या बाजुला झोपला होता.

या कालावधीत भुरट्या चोराने त्याच्या खिशातील मोबाईल काढून पळ काढला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. त्याने मोबाईल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

पोलिसांनी दोन्ही घटनांचा एकाचवेळी तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना आरोपी भिवंडी येथील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपी सुरज मोरया, समीर खानबाई यांना अटक केली. त्यांनी कल्याण परिसरातील रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT