pushpak express rail sakal
मुंबई

Mumbai : पुष्पक एक्सप्रेसच्या महिला डब्यातुन पुरुषाचा प्रवास ; संतप्त महिलांनी कल्याण RPF पोलिसांना मदतीचा पाठवला मॅसेज

आरपीएफ येताच पुरुषांनी काढला पळ, 5 जणांना घेतलं ताब्यात

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : एक्सप्रेस मध्ये महिलांसाठी आरक्षित डब्यात पुरुष प्रवासी चढत असून ते महिलांना बसण्यासाठी देखील जागा देत नसल्याची घटना पुष्पक एक्सप्रेस मध्ये घडली आहे. पुरुष प्रवाशांची अरेरावी पाहता महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कल्याण आरपीएफ पोलिसांना मदतीसाठी एक मॅसेज केला.

पोलिसांनी देखील तत्परता दाखवीत कारवाई केली. आरपीएफ पोलीस गाडीत शिरताच पुरुषांनी पळ काढण्यास सुरवात केली. तर 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तक्रारींची वाट न पाहता पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे महिला प्रवाशांनी त्यांचे आभार मानले.

लखनऊहून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये ही घटना घडली आहे. नाशिक ते कल्याण दरम्यान महिला आरक्षित डब्यात पुरुष प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होत होता. पुरुष प्रवासी डब्यात तर चढलेच पण विशेष म्हणजे महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरती ते बसले. इतर महिलांना बसण्यास ते जागा देत नसल्याने संतप्त महिला प्रवासी व महिला प्रवासी संघटनेने आरपीएफ पोलिसांना तक्रार न देता मदतीचा मेसेज टाकला.

मॅसेज मिळताच कल्याण आरपीएफ महिला टीम पुष्पक एक्सप्रेस कल्याण स्टेशनवर पोहोचण्याआधीच तैनात झाली. गाडी कल्याण स्टेशनवर येतात महिला डब्यात शिरूर पुरुष प्रवाशांना धडा शिकवत त्यांना सामानासह डब्याच्या खाली उतरवले. आर पी एफ पोलिसांची ही कारवाई पाहताच डब्यात शिरलेले अनेक प्रवाशांनी महिला डब्यातून पळ काढला सध्या पोलिसांनी पाच प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी मेसेजवर कारवाई केल्याने महिला प्रवासींकडून पोलिसांचे आभार व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India : विसरून जा पैशाचं पाकीट अन् कागदपत्रे! प्रजासत्ताक दिनला पाहा भारताचे 4 'डिजिटल ब्रह्मास्त्र', ज्यांनी देशाला बदलून टाकलंय

बापरे! मराठमोळ्या रिलस्टारचं निधन, प्रथमेश कदमच्या जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का, आई-मुलाची होती सुपरहिट जोडी

Yuvraj Singh : ''पण तू १२ चेंडू फिफ्टी मारू शकत नाहीये''; अभिषेक शर्माबाबत युवराज सिंगची पोस्ट व्हायरल!

Republic Day 2026: संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा फोटो! 77व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा खास लूक चर्चेत

Latest Marathi news Update : परेडमध्ये टी-९० भीष्म आणि अर्जुन रणगाडयांची गर्जना,नौदलाच्या संचलनात आयएनएस विक्रांतचा समावेश

SCROLL FOR NEXT