Mumbai sakal
मुंबई

Mumbai : कल्याण मध्ये एका व्यक्तीचा थरार; स्कायवॉकच्या जाळीवर जाऊन बसला

एक व्यक्ती शुक्रवारी सकाळी स्कायवॉकच्या बाहेर असलेल्या जाळीवर चक्क जाऊन बसला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी यांचा कायम वावर असतो. यातीलच एक व्यक्ती शुक्रवारी सकाळी स्कायवॉकच्या बाहेर असलेल्या जाळीवर चक्क जाऊन बसला. धोकादायक अवस्थेतील त्याचा तो वावर पहाता कामावर जाण्याची घाई असताना सुद्धा नागरिक थांबून थांबून त्याला पहात होते. टीवची माहिती स्थानिक पोलीस व अग्निशमन दलास मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीला सुरक्षित खाली उतरवले. त्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसून त्याला महात्मा फुले चौक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

कल्याण पश्चिमेला असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्कायवॉकवर कायम भिकारी, गर्दुल्ले यांचा वावर राहिला आहे. यामुळे प्रवाशांना अनेकदा त्रास ही सहन करावा लागला आहे. सध्या रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू असून या स्कायवॉकचा ढाचा काढण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचा वावर कमी असला तरी गर्दुल्ले, भिकारी आज ही या स्कायवॉक वर असतात. शुक्रवारी सकाळी असाच एक व्यक्ती स्कायवॉकच्या जाळीवर चक्क जाऊन पाय खाली सोडून बसला. त्याचे ते वर्तन पाहून सकाळी कामावर जाण्याची घाई असतानाही नागरिक थांबून थांबून त्याच्याकडे पहात होते. यामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. काहींनी त्याचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला.

काही नागरिकांनी याविषयी ची माहिती महात्मा फुले चौक ठाण्यातील पोलिसांना दिली. तसेच अग्निशमन दलास देखील साधारण 10.30 च्या सुमारास माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सिडीच्या सहाय्याने त्याला सुरक्षित खाली उतरवले. सदर व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची बाब समोर आली असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT