esakal Breaking News 
मुंबई

Kandivali Slab Collapsed: कांदिवलीत घराचा स्लॅब कोसळला; तरुणाचा मृत्यू

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईत सध्या मुसळधार पावसानं थैमान घातलं असून कांदिवलीत एका घराचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Mumbai Kandivali House Slab Collapsed Death of a young man)

या दुर्घटनेत किसन धुला (वय ३५) नामक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. दुर्घटना घडल्यानंतर शेजाऱ्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील किसनला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मुंबईत मुसळधार पावसामुळं जीर्ण झालेली घरं कोसळून दुर्घटना होण्याच्या घटना वाढतच आहेत. पावसाला सुरुवात झाल्यापासून मुंबईच्या मालाड, घाटकोपर विद्या विहार अशा विविध ठिकाणी घरे कोसळून ७ पेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटना ताज्या असतानाच मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील बानडोंगरी अशोक नगर परिसरातील एक घर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT