Irshalwadi Landslide Update  esakal
मुंबई

Mumbai : इर्शाळवाडीतिल दुर्घटनेनंतर केडीएमसीला आली जाग; कल्याणतील कचोरे टेकडीवरील 15 कुटुंबाचे स्थलातरण

कल्याण शहरातील नेतीवली आणि कचोरे टेकडीवर झोपडपट्टी ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर कल्याण परिसरातील नेतीवली व कचोरे टेकडीवरील 15 कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. दरवर्षी पावसाळ्यात नेतीवली व कचोरे टेकडीवर घरांची पडझड होणे, भाग खचने यांसारख्या दुर्घटना घडत असतात.

टेकडीवरील जागा धोकादायक अवस्थेत असतानाही याठिकाणी झोपडपट्टी मध्ये मात्र दरवर्षी वाढ होत आहे. दुर्घटना घडून कोणतीही जीवित हानी होऊ नये याची उपरती यंदा पालिका प्रशासनाला झाली आहे.

कल्याण शहरातील नेतीवली आणि कचोरे टेकडीवर झोपडपट्टी ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. टेकडी खोदून या बेकायदा झोपड्या उभ्या रहात आहेत. तसेच या टेकड्यावर दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळणे, घरांची पडझड, जमीन खचणे यांसारख्या घटना घडत असतात. या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत तर, काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

यंदा इर्शाळ वाडी दरड दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली प्रशासनाला जाग आली आहे. केडीएमसीने कचोरे टेकडीवरील 15 कुटुंबांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

टेकडी वर असलेला मोठा दगड पडल्यास या दगडाखाली जवळपास 15 घरे चिरडण्याची भीती असल्याने प्रशासनाने हा दगड हटविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश शहर अभियंत्याना दिले आहेत.

जोपर्यंत या दगडाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत या 15 कुटुंबाचे पालिकेच्या सभागृहात स्थलांतरित केली जाणार आहेत. पावसाळ्याच्या काळात किंवा धोकादायक दगड हटेपर्यंत ही कुटुंबे या सभागृहात राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vajreshwari Kund : वज्रेश्वरीतील गरम पाण्याचे झरे धोक्यात! शंकर मंदिरासमोरील पवित्र कुंड पूर्णपणे कोरडे; भाविकांमध्ये तीव्र नाराजी, गेल्या 3 वर्षांपासून नेमकं काय घडतंय?

Gangapur farmers: गंगापूर तालुक्यात मान्सून रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा, 15 जूननंतर पेरणीचा सल्ला

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत सात वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी चामोर्शी कडकडीत बंद

MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास..

वर्ल्डकपआधीच फूटबॉलविश्व हादरलं! मुंबईत नामांकित प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ बनवून ३ वर्षे ब्लॅकमेल

SCROLL FOR NEXT