मुंबई

Mumbai - Kolhapur Special Train| आता मुंबई ते कोल्हापूर विशेष ट्रेन दररोज धावणार

कुलदीप घायवट

मुंबई  : मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त विशेष गाडी चालविणार आहे.  गाडी क्रमांक 01411 विशेष गाडी 2 फेब्रुवारी 2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 8.20 वाजता सुटेल. ही गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूरला दुसर्‍या दिवशी सकाळी 7.20  वाजता पोहोचेल. 

गाडी क्रमांक 01412 विशेष गाडी 1 फेब्रुवारी 2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दररोज रात्री 8.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 7.25 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, कर्जत, खंडाळा (केवळ 01412 साठी), पुणे, सातारा, कराड, ताकारी, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले येथे थांबा देण्यात येणार आहे. 

 या गाडीची संरचना एक द्वितीय वातानुकूलित डबा, दोन तृतीय वातानुकूलित डबे, 10 शयनयान  आणि 5 द्वितीय आसन श्रेणी अशी असणार आहे. 
या गाडीचे  पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी क्रमांक 01411/01412 चे  सर्वसाधारण शुल्कासह बुकिंग 25 जानेवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल,असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Mumbai Kolhapur Special Train will run daily central railway marathi news 

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT