मुंबई

विशाखा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागृती हवी; भाजपची राज्य कामगार आयुक्तांकडे मागणी

कृष्ण जोशी

मुंबई  ः कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी असलेल्या विशाखा कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्याच्या कामगार आयुक्तांकडे केली आहे. 

त्यांनी शनिवारी कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर तसेच उपायुक्त निलांबरी भोसले यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. नोकरदार महिलांना त्यांच्या या विषयावरील तक्रारी त्वरेने आणि गोपनीय पद्धतीनेही करता याव्यात यासाठी संपर्क यंत्रणा (हेल्पलाइन) उभारावी, असेही त्यांनी सूचवले. 
या कायद्याप्रमाणे शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे हे मालकांवर बंधनकारक आहे. तरीही विशेषत: खासगी आस्थापनांमध्ये या नियमाचे सर्रास उल्लंघन होते. नोकरी जाण्याच्या भीतीने खाजगी आस्थापनेतील महिला लैंगिक सतावणुकीची तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. 

खासगी आस्थापनांवर सरकारचा कुठलाही अंकुश नसल्याने तिथे महिलांचे शोषण होण्याची शक्‍यताही अधिक आहे, असे आढळून आले आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध दाद मागण्यासाठी विशाखा कायदा आहे, याची अनेक नोकरदार महिलांना माहितीही नसल्याची बाब वाघ यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

---------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai latest marathi news updates Awareness needed implementation Visakha Act demand BJP

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामान खात्याची मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT