corona vaccine sakal media
मुंबई

मुंबईत मंगळवारनंतर भासणार कोरोना लसींची कमतरता ?

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा लस तुटवडा ( less corona vaccines) भासू शकतो. सध्या पालिकेकडे (BMC) मंगळवारपर्यंतचा लसीचा साठा उपलब्ध आहे. जर पालिकेला मंगळवारी किंवा त्यापूर्वी सरकारकडून लसीचा साठा (Government vaccines stock) मिळाला नाही तर मंगळवार नंतर लसीकरणावर परिणाम (impact on vaccination) होऊ शकतो. (Mumbai-less corona vaccines-BMC-Government vaccines stock-nss91)

लसीच्या अभावामुळे, अनेक वेळा पालिकेला आठवड्याच्या शेवटी लसीकरण केंद्रे बंद करावी लागतात. 16 जानेवारीपासून मुंबईत सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 72 लाखांहून अधिक लोकांना लसीचे डोस मिळाले आहेत. लसीकरणाच्या सुरुवातीला पालिकेने दावा केला होता की जर वेळेवर लस मिळाली तर ती एका महिन्यात संपूर्ण मुंबईकरांचे लसीकरण होऊ शकते.

परंतु, लसीअभावी पालिकेचा हा दावा अनेक वेळा फोल झाल्याचे सिद्ध झाले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी साांगितले की, शुक्रवारी पालिकेला लसीचा नवीन साठा मिळाला.  पालिकेला शुक्रवारी एक लाख 80 हजार डोस मिळाले आहेत. रविवारी लसीकरण केंद्र बंद केल्यामुळे हा साठा मंगळवारपर्यंत राहील. मंगळवारी नवीन साठा मिळू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. जर साठा मिळाला नाही तर लसीकरणावर परिणाम होऊ शकतो. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत लसीकरणाचा वेग जोरात आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत 1 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले, त्यापैकी 70 टक्के लसीकरण पालिका केंद्रांवर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress vs BJP Political Clash : 'मरण्यापूर्वी ज्याप्रमाणे दिवा तेजाने पेटतो, त्याप्रमाणे भाजपचा शेवट जवळ आलाय'; DK शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

CJI SuryaKant: एनसीईआरटीचा धडा वादाच्या भोवऱ्यात! न्यायिक भ्रष्टाचार प्रकरणावर सरन्यायाधीशांचा थेट इशारा!

दहावीच्या पेपरला गेलेली विद्यार्थीनी वर्गातच कोसळली, उपचाराआधीच मृत्यू; काय घडलं?

Viral Video : भर लग्नात मर्डरचा थरार! प्रियकराने वरमालावेळी नवरीवर झाडल्या गोळ्या; नवरदेव बघतच राहिला अन्...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT