Mumbai Lift Accident 
मुंबई

Mumbai Lift Accident : कमला मिल ट्रेड वर्ल्ड इमारतीतील लिफ्ट कोसळली; 12 जण जखमी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - लोअर परळ सेनापती बापट मार्ग, कमला मिल कंपाऊंड मधील तळ अधिक १४ मजली ट्रेड वर्ल्ड इमारतीची लिफ्ट आज सकाळी ११.४० च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत १२ जखमी झाले असून जखमींपैकी ८ जखमींना ग्लोबल रुग्णालय, तर एका जखमीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. जखमींपैकी चार जखमींना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.

लोअर परळ, सेनापती बापट मार्ग, कमला मिल कंपाऊंड मधील ट्रेड वर्ल्ड ही तळ अधिक १४ मजली इमारत असून या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन ११.४० वाजता लिफ्ट खाली कोसळली. या दुर्घटनेत १२ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्लोबल रुग्णालय व केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रियंका चव्हाण (२६), रतिक शिंदे (२६), अमित शिंदे (२५), मोहम्मद रशीद (२१), प्रियांका पाटील (२८), सुधीर शहारे ( २९), मयूर गोरे ( २८), तृप्ती कुबल ( ४६) या जखमींना ग्लोबल रुग्णालयात दाखल केले आहे. तर किरण चौकेकर ( ४८) या जखमीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT