local mumbai  sakal
मुंबई

Mumbai Local: लोकलमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीला १ दिवसाची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: मुंबई लोकल ट्रेनमध्ये २०१९ मध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ४९ वर्षीय पुरुषाला एक दिवसाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने आरोपीला न्यायालयाची पूर्ण दिवसाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत शिक्षा भोगण्याचे निर्देश देत त्याला १००० रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने आरोपीचा त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा मान्य करण्यासही नकार दिला. तसेच महिलेचे त्याच्याशी पूर्वीपासून कोणतेही वैयक्तिक वैर नसल्याच्या आरोपीच्या दाव्याचे न्यायालयाने खंडन केले.

अधिक माहितीनुसार १३ ऑगस्ट २०१९ रोजी पीडिता पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना आरोपींनी तिचा वारंवार विनयभंग केला. त्यानंतर महिला आणि तिच्या भावाने आरोपीला शिवीगाळ करत त्याला पकडून वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्ह्याची नोंद केली. तक्रारदार महिला आणि इतर साक्षीदारांच्या पुराव्यावरून आरोपीवरचे आरोप उघड झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT