Mumbai Local  sakal
मुंबई

Mumbai Local : बदलापूरकरांची सोय झाली डोंबिवलीकर वंचित, छताअभावी प्रवाशांचे हाल

Badlapur: फलाट क्रमांक पाचवर छत टाकण्याचे काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivli: फलाटाचा विस्तार केला पण छतच टाकले नाही, तर कुठे काम सुरू असल्याने छताचे पत्रे काढलेत अशी स्थिती डोंबिवली रेल्वे स्थानकाची आहे. यामुळे गेले कित्येक महिने डोंबिवलीकर उन्हाचा त्रास सहन करत होते आता त्यांना पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. बदलापूर स्थानकात देखील काहीशी अशीच परिस्थिती होती.

भिवंडी खासदारांनी बदलापूर स्थानकाची पाहणी करतात रेल्वे प्रशासनाने येथे तात्पुरत्या स्वरूपाचे शेड उभारले. मात्र डोंबिवलीकरांना ही सुविधा देण्यास रेल्वे प्रशासन विसरले. कल्याण लोकसभेचे खासदार रेल्वे प्रवाशांच्या या समस्येकडे कधी लक्ष देणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर गेल्या वर्षापासून छत नाही. त्यामुळे गेले आठ महिने उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षापासून प्रवाशांंकडून, रेल्वे प्रवासी संघटनांकडून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात छत बांधण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांंकडे केली जात आहे.

या कामासाठी निधी मंंजूर आहे. काम लवकर सुरू होणार आहे, अशी आश्वासने अधिकारी वर्षभर देत आहेत. प्रत्यक्षात मात्र काम सुरू होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वतावरण आहे.

कडक उन्हाच्या झळा सोसल्यानंतर आता पावसास सुरुवात झाली आहे. पाऊस आल्यावर फलाट क्रमांक पाच वरील प्रवाशांना छत असलेल्या भागात धावत जावे लागते. राहावे लागते. लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात येत आहे हे दिसल्यावर मग प्रवासी छताखालून निघून छत नसलेल्या भागात जातात.

यावेळी हातात छत्री असल्याने लोकलमध्ये चढताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच छत्री बंद करून गाडीत चढे पर्यत प्रवासी पावसाने ओलेचिंब होत आहेत. या सगळ्या गडबडीत महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे.

वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तर लोकलचे दरवाजे काही सेकंदांनी उघडतात. त्यानंतर लोकलमध्ये चढावे लागते. रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन फलाट क्रमांक पाचवर छत टाकण्याचे काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटांवर अनेक ठिकाणी सरकते जिने, लिफ्ट, छताची डागडुजीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. ते स्कायवाॅकला जोडण्यात आले आहेत.

या तांत्रिक बाबींमुळे अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकात पावसाचे पाणी गळत आहे. डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकाचा बहुतांशी भाग पावसाच्या पाण्याने गळत असल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.

बदलापूर, टिटवाळा रेल्वे स्थानकात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी मध्यंतरी बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती. त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

यानंतर रेल्वे प्रशासनाने स्थानकात तात्पुरत्या स्वरूपाचे शेड उभारून बदलापूरकर प्रवाशांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र इतर स्थानकात ही सुविधा देण्यास रेल्वे प्रशासन विसरले.

भिवंडी खासदारांनी पाहणी केल्यावर प्रवाशांना सुविधा मिळाली. मग कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा रेल्वे स्थानकाची पाहणी कधी करणार जेणेकरून रेल्वे प्रशासनाला जाग येईल अशी विचारणा डोंबिवलीकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT