Mumbai Local 
मुंबई

Mumbai Local Breaking: मेगाब्लॉकमधून मुंबईकरांना मिळणार दिलासा : कसा ? वाचा सविस्तर !

Chinmay Jagtap

Mumbai Local Breaking: रेल्वेने हार्बर मार्गावर ३८ तासांचा असा मोठा ब्लॉक घेतला आहे. याच बरोबर मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवारी नियमित होणारा ब्लॉक घेतला तर नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहेत.यामुळे रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

तो असा कि, रेल्वेने मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवारचा ब्लॉक रद्द केला आहे. पश्चिम रेल्वेनेसुद्धा रविवारी दिवसाचा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी दर रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र, हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेतल्याने मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवारचा ब्लॉक रद्द केला आहे.

तर पश्चिम रेल्वेने वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. ३०) रात्री ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ३.३० आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १.१५ ते पहाटे ५.१५ वाजेपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान विरार ते भाईंदर-बोरिवली दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT