mumbai local sakal
मुंबई

Mumbai Local News: लोकलच्या वेगमर्यादेमुळे हार्बरवासीयांचे हाल!

वडाळा ते सीएसएमटी गाड्यांची रांग

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: सीएसएमटी स्थानकात तीन दिवसांत दोनदा लोकल रुळांवरून खाली घसरण्याची घटना घडली. त्यानंतर मध्य रेल्वेने प्रशासनाने रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यानंतर खबरादारी म्हणून हार्बर मार्गावरील अपघातग्रस्त जागेवर १० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा लागू केली. (mumbai haurbar Local)

त्यामुळे हार्बर मार्गावरून सीएसएमटी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल सेवा कासवगतीने ये-जा करत असल्याने लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लेटमार्क लागला.(mumbai news)

उन्हाळ्यामुळे मुंबईकरांना लोकलच्या गर्दीचा प्रवास नकोसा वाटत आहे. त्यातच सलग दोन दिवस लोकल रुळावरून खाली घसरल्याने मुंबईकरांचे पुरते हाल झाले. पनवेल- सीएसएमटी लोकल सोमवारी (ता. २९) सीएसएमटी स्थानकात शिरताना प्लॅटफॉर्म क्रमाक दोनवर घसरली. या घटनेनंतर बुधवारी (ता. १) चाचणीदरम्यान त्याच ठिकाणी लोकलच्या एका डब्याची दोन चाके रुळावरून घसरली.

यामुळे हार्बर आणि मुख्य मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. लागोपाठ दोन घटना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (ता. २) मस्जिद बंदर ते सीएसएमटी स्थानकापर्यंत लोकलची वेगमर्यादा १० किलोमीटर प्रतितास ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळपासून लोकलचे वेळापत्रक पुरते विस्कळित झाले होते.

लोकलच्या रांगा

हार्बर मार्गावरील लोकलचा वेग गुरुवारी (ता. २) सकाळपासून मंदावला होता. त्यामुळे वडाळा ते सीएसएमटीदरम्यान लोकलची एकामागोमाग एक रांग लागली होती. रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. अनेकांनी कंटाळून टॅक्सी आणि रिक्षाने जाणे पसंत केले. वेगमर्यादेमुळे विस्कळित झालेले वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी अनेक लोकल रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला.(mumbai local news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT