Mumbai Local Crime: sakal
मुंबई

Mumbai Local Crime: रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरणाऱ्यांना पोलिसांनी ठकल्या बेड्या

Mumbai Local Crime: गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषन विभागाकडून केला जात होता

शर्मिला वाळुंज

Mumbai Local Crime: कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वेची वाट पाहणारे प्रवाशांच्या सामानातून त्यांच्या नकळत सामानाची चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिनेश निनावे (वय 33) आणि संतोष चौधरी (वय 35) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून पोलिसांनी 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 6 मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला आहे. तसेच कल्याण रेल्वे स्थानकातील 4 व ठाणे रेल्वे स्थानकातील 1 अशा 5 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. मे महिन्यात या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून तीन महिन्यानंतर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातून महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये चढताना एका प्रवाशाची सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना मे महिन्यात रात्रीच्या वेळी घडली होती. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषन विभागाकडून केला जात होता.

तांत्रिक विश्लेषण व इतर बाबींच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता दिनेश याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे तपास केला असता त्याने साथीदार संतोष याच्या मदतीने चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संतोष यालाही सापळा रचून अटक केली.

पोलिसांनी त्यांच्याकडून 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 5 मोबाईल, 1 टॅब असा एकूण 4 लाख 14 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कल्याण रेल्वे पोलिस ठाणे येथील 4 व ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यातील 1 गुन्ह्यााची कबुली या आरोपींनी दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना आपल्या किंमती मालमत्तेची काळजी घेण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

प्रवाशांच्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अशरुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना पोलिसांनी स्थानक परिसरातील सीसीटिव्ही तपासले. या तपासात दोन चोरटे हे रेल्वे स्थानकात रेल्वेची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना लक्ष करीत त्यांच्या बॅगमधील सामान चोरुन पळ काढायचे, गाडीत चढण्याची लगबग असलेल्या प्रवाशांची बॅग हिसकावून पळणे अशा चोऱ्या करताना आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक असतात सगळ्यात जास्त घातक; तोंडावरून वाटतात साधेभोळे, पण कधी तुमचा काटा काढतील कळणारही नाही

SCROLL FOR NEXT