Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local Crime: वाशी ते नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान एका दिवसात तीन प्रवाशांना लुटले

तीन फरार लुटारुंचा रेल्वे पोलिसांकडुन शोध सुरु ; एका लुटारुला प्रवाशांनी पकडले

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai Crime: वाशी ते नेरुळ या हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांना लुटणाऱया लुटारुंनी हैदोस घातला असून या लुटारुंनी गत गुरुवारी एका दिवसामध्ये सानपाडा ते नेरुळ या रेल्वे स्थानकामध्ये तीन प्रवाशांना लुटून त्यांचे महागडे मोबाईल फोन व इतर महत्वाची कागदपत्रे लुटल्याचे उघडकीस आले आहे.

या घटनेतील लुटारुंपैकी एका लुटारुला प्रवाशांनी पकडले असले तरी इतर तीन लुटारु पळून गेले आहेत. वाशी रेल्वे पोलिसांनी या लुटांरु विरोधात जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

फैसल मोहम्मद हारुन शेख (25) हा तरुण सीवूड्स येथे राहण्यास असून तो गुरुवारी नेरुळ येथे राहणाऱया बहिणीच्या घरी गेला होता. त्यानंतर तो मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास सीवूड्स येथे जाण्यासाठी नेरुळ रेल्वे स्थानकात आला होता.

यावेळी तो फलाट क्रं.3 वर मोबाईल फोनवर बोलत असताना, करण विठ्ठल लष्करे (20) या लुटारुने फैसलच्या हातातील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन खेचुन पलायन केले. यावेळी त्याचे इतर दोघे साथीदार देखील पळून जात असताना, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीने करण लष्करे याला पकडले.

दरम्यान, याच त्रिकुटाने गुरुवारी सायंकाळी जुईनगर रेल्वे स्थानक आवारात राजु गायकवाड (42) या व्यक्तीला लुटल्याचे उघडकीस आले आहे. नायगाव दादर येथे राहणारे गायकवाड यांचा कायद्याच्या पुस्तकांची विक्री करण्याचा व्यवसाय आहे.

गुरुवारी सांयकाळी ते खारघर येथे कामानिमित्त आले होते. त्यानंतर ते जुईनगर येथे एका ग्राहकाला पुस्तके देण्यासाठी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खारघर येथून जुईनगर रेल्वे स्थानकात उतरले होते. यावेळी लघुशंका करण्यासाठी ते फलाटाच्या बाहेर गेले असताना, या त्रिकुटाने त्यांना झुडपामध्ये नेऊन जबरदस्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल फोन व पाकिट काढुन घेतल्यानंतर पलायन केले.

त्यानंतर राजु गायकवाड यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोन्ही घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी करण लष्करे याच्यासह त्याच्या दोघा साथिदाराविरोधात दोन जबरी चोरीचे गुन्हे दाखल करुन पळुन गेलेल्या दोन्ही लुटारुंचा शोध सुरु केला आहे. या लुटारुंनी हार्बरल रेल्वे मार्गावर अशाच पद्धतीने आणखी काही चोरी-जबरी चेरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नेरुळ भागात राहणारा एरोन मस्कारेहस (18) हा तरुण मुंबईतील बांद्रा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून गत गुरुवारी तो नेहमीप्रमाणे आपल्या कॉलेमध्ये गेला होता. कॉलेजमधुन सुटल्यानंतर तो लोकलने नेरुळ येथे परतत होता.

यावेळी सदरची लोकल रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सानपाडा रेल्वे स्टेशन येथे थांबुन पुढच्या दिशेने निघाली असताना, सदर लोकलमध्ये असलेल्या एका लुटारुने एरोन याच्या हातातील 45 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन खेचुन धावत्या लोकलमधुन फलाटावर उडी टाकुन पलायन केले. या प्रकरणात देखील वाशी पोलिसांनी अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT