CSMT Station Sakal
मुंबई

Mumbai Local : नशेच्या धुंदीत सीएसएमटी स्थानकात लोकलवर प्रवासी चढला! हार्बर विस्कळीत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक दोनवरील लोकलच्या छतावर नशेच्या धुंदीत एक प्रवासी चढल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम झाला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक दोनवरील लोकलच्या छतावर नशेच्या धुंदीत एक प्रवासी चढल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम झाला.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक दोनवरील लोकलच्या छतावर नशेच्या धुंदीत एक प्रवासी चढल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम झाला आहे. ही घटना रात्री साडे नऊच्या सुमारास घडल्याने कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हार्बर लाईनच्या फलाट क्रमांक २ वर पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी सायंकाळी नऊच्या सुमारास लोकल सीएसएमटी स्थानकात आली असता एका व्यक्तीने गाडीच्या छतावर चढून ओव्हर हेड वायरला स्पर्श केला. त्यामुळे मोठा आवाज होऊन तो बाजूला फेकला गेला. परिणामी फलाटावरील प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. तसेच अनेकांनी गाडीतून बाहेर धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच आरपीएफच्या जवानांनी धाव घेत संबंधितला खाली उतरवले. या घटनेमुळे सीएसएमटी स्थानकांवर येणाऱ्या लोकल एकामागेएक उभ्या होत्या. त्यामुळे लोकल सेवांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे काही काळ हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रवाशांचे हाल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT