मुंबई

मुंबई लोकलमध्ये सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला; तोंडावर केले वार

कुलदीप घायवट

CSMT स्थानकावर रेल्वे पोहोचल्यानंतर हल्लेखोर अटकेत; दोन साथीदार महिलांचा शोध सुरू

मुंबई: राज्यात सध्या लॉकडाउन सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आलेत. लोकल रेल्वेमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे लोकलमधील डब्यांमध्ये गर्दी फारशी नसल्याचे चित्र आहे. याच गोष्टीचा गैरफायदा घेत गर्दुल्ल्यांकडून प्रवाशांवर हल्ला केला जात आहे. काही वेळा त्यांना लुटल्याचीही घटना घडत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड ते CSMT लोकल प्रवासात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशावर गर्दुल्याने हल्ला केले. त्याच्याकडून 15 ग्रॅमची सोन्याची चेन चोरी केली. घटनेची माहिती CSMT पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. (Mumbai Local Drug Addict Attacks Govt Officer snatches golden chain finally arrested)

महसूल व वन विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी विजय वाघधरे बुधवारी (ता. 12) करी रोड ते CSMT प्रवास करत होते. मस्जिद बंदर स्थानक आले. त्यावेळी चोरी करण्याच्या उद्देशाने गर्दूल्यासह तीन महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले. मारहाण करून त्यांची 15 ग्रॅमची सोन्याची चैन त्यांनी खेचली. तसंच त्यांचे ओळखपत्रही हिसकावून घेतले. लोकल CSMT येथे आली असता, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आशीत शेख आणि जायर शेख यांना ताब्यात घेतले. उर्वरित दोन महिलांचा शोध सुरू आहे, अशी माहिती CSMT पोलिसांनी दिली.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT