मुंबई

Mumbai Local: प्रेयसी करत होती विना तिकीट प्रवास; टीसीने खडसावताच प्रियकराला आला राग अन्...

सकाळ डिजिटल टीम

हार्बर रेल्वे मार्गावरील गुरू तेगबहादुर नगर (जीटीबी) स्थानकात एका युवकाने महिला तिकीट तपासनिसाला (टीसी) मारहाण केल्याची घटना ताजी असताना पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकातही कर्तव्यावरील टीसीला तरुणांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बोरिवली स्थानकात एका तरुणीला टीसीने तिकिटाची विचारणा केली; परंतु तिच्यासोबत असलेल्या तरुणाने टीसीला ही मारहाण केली. रविवारी (ता. २६) घडलेल्या या प्रकाराचा फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

बोरिवली रेल्वे स्थानकात टीसी राहुल शर्मा रविवारी सकाळी ११ च्या सुमारास कर्तव्य बजावत होते. यादरम्यान एका तरुणीला त्यांनी तिकिटाची विचारणा केली असता तिच्याकडे तिकीट नव्हते. शर्मा यांनी तिला दंड भरण्यास सांगितले असता तिने वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक बाचाबाचीनंतर तरुणीने आपल्या मित्रांना फोन करून स्थानकावर बोलावले.

यानंतर टीसी आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात टीसी आणि तरुण किरकोळ जखमी झाल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा स्थानकावर असलेल्या जवानांनी मध्यस्थी केली. त्यानंतर आपली चूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने माफी मागून दंडाची रक्कम भरल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

... तर प्रवाशांचे संरक्षण कसे करणार?

तरुणाच्या मारहाणीत जखमी झालेल्या टीसी राहुल शर्मांचा फोटो ‘एनसीएम इंडिया कौन्सिल फॉर मेन अफेअर्स’ या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) हँडलवरून व्हायरल होत आहे. यात शर्मा रक्तबंबाळ झाल्याचे दिसून येत आहे. बोरिवली स्थानकात टीसी राहुल यांना तरुणीने तिच्या मित्रांसह मारहाण केली.

रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या जीआरपी पोलिसांनीही तिच्याविरोधात काहीच कारवाई केली नाही. रेल्वेला स्वत:च्या अधिकाऱ्यांचेच संरक्षण करता येत नसेल, तर ते सामान्य प्रवाशांचे रक्षण कसे करणार, असा प्रश्न याद्वारे विचारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT