दिव्यांगाना लोकलचे तिकिट, पास मिळण्याचा तिढा सुटला sakal
मुंबई

मुंबई : दिव्यांगाना लोकलचे तिकिट, पास मिळण्याचा तिढा सुटला

दिव्यांग प्रवाशांच्या अनेक तक्रारी; रेल्वे प्रशासनाने घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकल प्रवासासाठी दिव्यांग प्रवाशांना मुभा असताना, दिव्यांग प्रवाशांना तिकिट खिडकीवर सवलतीचे पास, तिकिट देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अनेक दिव्यांग प्रवाशांची महत्त्वाची कामे अडकून पडली होती. दिव्यांग प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासन, राज्य सरकाराला तक्रार करून देखील कोणतीही दखल घेतली जात नव्हती. मात्र, अपंग कल्याण आयुक्तालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्व यंत्रणा जागृत होऊन मध्य रेल्वेनेही दिव्यांग प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेतली. 

एप्रिल महिन्यात 'ब्रेक द अंतर्गत' सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद केला. फक्त लोकल प्रवासात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण, दिव्यांग प्रवासी आणि यांच्यासोबत एका प्रवाशाला परवानगी दिली. मात्र, दिव्यांग प्रवाशांना लोकलचे सवलतीचे पास आणि तिकिट देण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नकार दिला जात होता. राज्य सरकारच्या आदेशाची प्रत दाखविले तरी, सवलतीचे पास, तिकिट दिले जात नव्हते. सामान्य पास आणि तिकिट दिले जात होते. परिणामी, याविषयी दिव्यांग प्रवाशांनी तक्रार करण्यास सुरूवात केली, तरीही रेल्वे प्रशासन, राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावरून एप्रिलपासून अनेक दिव्यांग प्रवाशांना तिकिट,पास मिळत नव्हते. याविषयी अनेक ट्विटरद्वारे तक्रारी केल्या. तरीही यावर कोणतीही प्रतिक्रिया येत नव्हती. मे, जूनमध्येही अनेक दिव्यांग प्रवाशांना लोकलचे तिकिट मिळविण्यासाठी भांडणे करावी लागत होती. त्यानंतर 5 जून रोजी मुख्यमंत्री, पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. दोन्ही रेल्वेच्या कमर्शिअल मॅनेजरला भेट दिली. तरीही, काही ठिकाणी तिकिट दिले जात होते, तर काही ठिकाणी नाही. शेवटी अपंग कल्याण आयुक्तालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी रेल्वेकडून दखल घेण्यात आली आहे, असे निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाचे अध्यक्ष नितिन गायकवाड यांनी सांगितले.

नुकताच ठाणे, वसई रोड, डोंबिवली, उल्हासनगर, सॅडहर्स्ट रोड यासह इतर स्थानकावर दिव्यांगांना तिकिट नाकारले जात होते. कोरोना काळात दिव्यांगांची परिस्थिती वाईट झाली आहे. त्यात लोकल प्रवास करण्यासाठी अडचणी येत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने तिकिट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांना सूचना द्यावी की, दिव्यांगांसाठी सवलतीचे तिकिट आणि पास द्यावे. तसेच तिकिट खिडकी बाहेरही ठळक अक्षरात तशा सूचना लिहिणे आवश्यक आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT