Mumbai local Sakal
मुंबई

Mumbai Local : पावसामुळे लोकलला लेटमार्क!

मुंबई आणि उपनगरात सकाळी पावसाचा जोर वाढला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बुधवारपासून मुंबईसह उपनगररात मुसळधार पावसाचा जोर गुरुवारची सकाळीपर्यत कायम होता. सखल भागांत पाणी साचले रस्ते जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कासवगतीने सुरु होती तर रेल्वे वाहतुकीलाही पावसामुळे लेटमार्क लागला. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना कार्यालयात पोहचण्यासाठी लेटमार्क लागला आहेत.

मुंबई आणि उपनगरात सकाळी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. लोकल वाहतूक उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची काही प्रमाणात गर्दी रेल्वे स्थानकावर दिसून आली होती. मात्र ११ नंतर वाहतूक पूर्ववत झाली.

रस्त्यावर पावसामुळे वाहतूक मंदावली होती मात्र दुपारी पाऊस ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली. मुसळधार पावसामुळे काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहे. तर अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

F-16 लढाऊ विमान हायवेवर कोसळलं, उड्डाणानंतर २ मिनिटांनी रडारवरून गायब; दुर्घटनेचा VIDEO आला समोर

Gold Rate Today: सलग 7 व्या दिवशी सोनं महागलं! सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा ताजा भाव

Kolhapur police action : दहशतीसाठी पिस्तुलाचा वापर, खून मारामारी गंभीर गुन्हे, कोल्हापूर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

Rinku Singh : वडील गंभीर आजाराशी देतायत झुंज, रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर; रिंकु सिंह T20 वर्ल्डकपला मुकणार?

Latest Marathi News Live Update : वाईनशॉप हटवण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT