Mumbai Mega Block sakal
मुंबई

Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

Local Mega Block: पश्चिम रेल्वेच्या माहीम ते गोरेगाव अप- डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २३ जून २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या माहीम ते गोरेगाव अप- डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- सीएसएमटी ते विद्याविहार अप - डाऊन धीम्या मार्गावर

कधी- सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन धीम्या मार्गावर मार्गावर वळविण्यात येणार आहेत. घाटकोपरहुन सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबेल.

हार्बर रेल्वे

कुठे - सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर

कधी - ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून येथून वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे-

कुठे -माहीम ते गोरेगाव अप - डाऊन हार्बर मार्गावर

कधी - सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वांद्रे आणि सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि काही चर्चगेट- गोरेगाव धीमी अप- डाऊन लोकल सेवा रद्द असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT