mega block in mumbai sakal
मुंबई

Mega Block :मुंबईकरांनो रविवारी प्रवास करण्याआधी जाणून घ्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल ! |

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ७ मार्च २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी- नेरुळ अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते अंधेरी अप- डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

.......

मध्य रेल्वे

कुठे- माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर

कधी- सकाळी १०.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि अप- डाऊन मार्गावरील लोकल सेवा आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

ट्रान्स-हार्बर

कुठे - ठाणे-वाशी/नेरळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर

कधी - सकाळी ११. १० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे

कुठे - माहीम ते अंधेरी मार्गावर

कधी - सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत

परिणाम- माहिम ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप-डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-बांद्रा,गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद राहणार आहे. तसेच चर्चगेट ते गोरेगाव लोकल सेवा देखील बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT