mumbai local mega block news
mumbai local mega block news  sakal
मुंबई

Mumbai Local Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: कधी कुठे कसा सगळं एका क्लिकवर...!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local Mega block : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १०) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे

कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाणे करिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील.(no panvel thane local during mega block)

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट - मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

वेळ : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत

मध्य रेल्वे

कुठे : सीएसएमटी-विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबून विद्याविहार स्टेशनवर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप-धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT