मुंबई

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: स्थानकावरील सर्व प्रवेशद्वार,जिने होणार खुले

कुलदिप घायवट

मुंबई: राज्य सरकारने गर्दीची वेळ वगळता सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्य महिलांप्रमाणे सर्वसामान्य पुरुष नोकरदार प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील बंद केलेली प्रवेशद्वार, जिने, सरकते जिने खुली करण्याच्या तयारीला लागले आहेत.

कोरोना आणि लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. तब्बल 10 महिन्यांनी लोकल सेवा ठराविक वेळेसाठी सर्व सामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लॉकडाऊन काळात सुरू केली. यावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व्यतिरिक्त अन्य प्रवाशांनी प्रवास करू नये, यासाठी स्थानकावरील पादचारी पूल, जिने, सरकते जिने, प्रवेशद्वार बंद केले होते. स्थानकात ये-जा करण्यासाठी आणि इच्छित फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांना खूप पायपीट करावी लागत होती. मात्र आता ठराविक वेळेत सर्व प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन आणि गर्दीचे विभाजन तत्काळ होण्यासाठी बंद केलेले सर्व प्रवेशद्वार, जिने, सरकते जिने, पादचारी पूल खुले केले जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

 राज्य सरकारने 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहे. यासह आरोग्याचे नियम पाळले जातील, यासाठीही खबरदारी बाळगून आहेत. 
त्यामुळे सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत  दुपारी १२ पासून ते दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवासी यावेळेव्यतिरिक्त लोकलमधून प्रवास करू शकत नाहीत, असे निर्देश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai local news All entrances local train station will open

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT