mumbai local death sakal
मुंबई

Mumbai Local News : ...अन् रिया घरी परतलीच नाही! डोंबिवलीच्या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेला राहणारी रिया... तीचं ऑफिस ठाण्याला... नेहमीप्रमाणे रियाने सकाळी डोंबिवलीवरून लोकल ट्रेन पकडली... पण गर्दीमुळे रियाला भरगच्च ट्रेनमध्ये आत शिरता आले नाही.. नाईलजास्तव तिला दरवाज्याजवळच थांबावे लागले आणि शेवटी जे नको होते तेच घडले.. रियाचा गर्दीमुळे तोल गेला आणि ट्रेनमधून पडून तिचा मृत्यू झाला. आता याला नियतीचा क्रूर खेळ म्हणावं की लोकल ट्रेनमधील गर्दीवर तोडगा काढण्यात आलेले अपयश? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आठवड्याभरात डोंबिवलीतील प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.

रिया श्यामजी राजगोर (वय 26) ही डोंबिवली पूर्वेला कुटुंबासह रहाते. रियाचे ऑफिस ठाणे येथे आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे रियाने ठाणे येथे जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबई दिशेला जाणारी जलद लोकल पकडली.

लोकलमध्ये गर्दी असल्याने रिया दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास करत होती. गाडीने वेग पकडल्यानंतर गर्दीच्या रेट्याने कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन ती खाली पडली. रेल्वे प्रवाशांनी आरडाओरडा केला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता रियाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान हा अपघात घडला. यापूर्वी 23 एप्रिलला डोंबिवलीत राहणाऱ्या अवधेश दुबे याचाही लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT