Mumbai Mega Block sakal
मुंबई

Mumbai Local News: मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाहाल !

सकाळ डिजिटल टीम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता.०३ : मध्य रेल्वेवर आज (ता.०३) मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना प्रचंड लोकल गर्दिचा सामान करावा लागला. रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच ब्लॉक संपून देखील रात्री उशिराने मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत होत्या.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला होता. त्यामुळे ब्लॉग कालावधीत जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळविण्यात आलेल्या होत्या.

परिणामी धीम्या मार्गावरील लोकल सेवांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला होता. याकाळात धीम्या लोकल फेर्‍या सुमारे १० ते १५ मिनिटे आणि जलद लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी बेहाल झाले होते.

तसेच सुट्टीच्या वेळापत्रकामुळे लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली होती. यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या.

तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द होत्या. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली. मात्र ब्लॉक संपल्यानंतर ही मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल फेर्‍यामध्ये गर्दी असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी प्रचंड हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सरकारला धास्ती! विखे पाटलांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Teachers Post : राज्यातील १३ हजार ११९ उमेदवारांची ‘शिक्षक’ पदासाठी निवड

Marathi News Live Updates : बिडकीन डीएमआयसीत महिलेच्या खुनाने खळबळ

Pune News : ‘आयसर’मध्ये आंदोलनाचा भडका; प्रशासनाच्या मनमानी कारभारावर ठपका

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT