karjat pavel mumbai local  sakal
मुंबई

Mumbai Local News|आनंदाची बातमी: पनवेल-कर्जत प्रवास होणार अजूनच फास्ट; तिन्ही बोगद्याचे काम  ८० टक्के पूर्ण

सर्वात मोठा वावर्ले बोगदा खोदण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून नढाळ आणि किरावली बोगदा खणण्याचे काम सुरू आहे |Excavation of the largest Wawarle tunnel is 90 percent complete and Nadhal and Kiravali tunnels are in progress.

सकाळ वृत्तसेवा

Panvel-Karjat Local Train: पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठा वावर्ले बोगदा खोदण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून नढाळ आणि किरावली बोगदा खणण्याचे काम सुरू आहे.

सुमारे तीन हजार १४४ मीटर लांबीच्या तिन्ही बोगद्यांचे ८० टक्यांपेक्षा जास्त काम पूर्णत्वास गेल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतला आहे. आतापर्यत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु असून आहे.

या मार्गाकरिता २ हजार ७८२ कोटी रुपये खर्च येणार असून या मार्गाची लांबी ३० किमी आहे. २०२४-२५च्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाकरिता ३०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामार्गामुळे प्रवास वे ळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. पनवेल-कर्जत या नव्या २९.६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके आहे. ३.१२ किमीचे तीन रेल्वे बोगदे आहेत. तसेच या रेल्वेमार्गावर दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल असणार आहे. या सर्वांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

रेल्वे बोगद्याची कामाची स्थिती -

या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी वावर्ले बोगदा हा २६२५ मीटर लांबीचा आहे. आतापर्यत २६२५ मीटरपैकी २,४२५ मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. पुढील काम प्रगतीपथावर आहे.

तर नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर असून आतापर्यत जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. पाणीगळती रोखण्याचे काम सुरू आहे. तर किरवली बोगदा ३२० मीटर लांबीचा असून जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. सुमारे तीन हजार १४४ मीटर लांबीच्या तिन्ही बोगद्यांचे ८० टक्यांपेक्षा जास्त काम पूर्णत्वास गेल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT