मुंबई

Mumbai Local Breaking : कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक गतिमान !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local Breaking : मुंबई विभागात येणाऱ्या कल्याण ते कसारादरम्यानची रेल्वे वाहतूक गतिमान करण्यासाठी फाटक बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या पुलाचे काम पूर्ण होताच येथील वाहतूक गतिमान होणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रकल्पासाठी येणार खर्च : १४ कोटी ५० लाख

८० टक्के काम पूर्ण

असा आहे प्रकल्प

१) रेल्वेच्या हद्दीत ५१ मीटर क्षेत्रात दोन ठिकाणी खांब उभारण्यात येणार आहेत. यातील सर्व चार पिलरवर १७५ मीटरपर्यंत पूर्व बाजूच्या ॲप्रोच रोडचे काम प्रगतिपथावर आहे.

ॲप्रोच रस्ता

- कल्याण टोक- १५ खांबांवर ४२५ मीटर

- इगतपुरी टोक- ८ खांबांवर ३२० मीटर

काय म्हणते प्रवासी संघटना?

रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावाने हा पूल गेली दहा वर्षे रखडला आहे. यामुळे टिटवाळा आणि परिसरातील नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडून प्रवास करावा लागत आहे. यामुळे कसारा मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत आहे, असे कल्याण- कसारा- कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव श्याम उबाळे यांनी सांगितले.

कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व रेल्वे फाटक हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कार्यवाही सुरू आहे.

- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT