मुंबई

Mumbai Local News: समर स्पेशलमुळे लोकल सेवा विलंबाने; मुंबईकर त्रस्त

गेल्या काही दिवसांपासून जलद मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहे.त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: उन्हाळ्यातील गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेवरून कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर भारतात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहे. मात्र या गाड्या विलंबाने धावत असल्याने त्याच्या थेट परिणाम उपनगरीय लोकलला बसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जलद मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहे.त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

उन्हाळी सुट्टी आणि देशभरातील लोकसभा निवडणूकायांमुळे यंदा भारतीय रेल्वेकडून देशात ९ हजार १११ विशेष एक्स्प्रेस फेऱ्या चालवण्यात येत आहे. सर्वाधिक १ हजार ८७८ फेऱ्या पश्चिम रेल्वेवरून आणि मध्य रेल्वेवरून ४८८ फेऱ्या चालवण्यात येत आहेत.

गतवर्षी उन्हाळी सुट्टीत ६ हजार ३६९ फेऱ्या देशभरात धावल्या होत्या.तसेच उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे नियमित आणि विशेष गाड्यांचे वेळा पाळण्यास रेल्वेला अपयश येत आहे.

अनेक मेल- एक्सप्रेस रेल्वे गाड्या वेळेवर धावत नसल्याने उन्हाळी विशेष गाड्यांचा वेळापत्रकावर परिणाम होत आहे. मुंबईत येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेत येत नसल्याने उपनगरीय लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम पडत आहे.

मध्य रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाडयांना मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी लोकल सेवा थांबून ठेवत असल्याने लोकल सेवा विलंबाने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना कार्यलयात पोहचण्यास विलंब होत असल्याने रेल्वेच्या कारभावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT