Mumbai Local News: 
मुंबई

Mumbai Local News: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

Mumbai Mega Block: पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २६ मे २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगांव ते बोरिवली अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- माटुंगा- ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर

कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे ठाणे स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर कल्याण येथून अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील . ब्लॉक कालावधीत दोन्ही दिशेचा लोकल सेवा आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

हार्बर रेल्वे

कुठे - सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर

कधी - ११. १० ते ४.१० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे-

कुठे - बोरिवली ते गोरेगांव अप- डाऊन धीम्या मार्गावर

कधी - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवा बोरिवली ते गोरेगांव स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

त्यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १,२, ३ आणि ४ वरून कोणत्याही ट्रेनचे आगमन/निर्गमन होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT