Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

Mumbai : हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकता |

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Megablock: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १६ जून २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही.

मध्य रेल्व -

कुठे- माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

हार्बर मार्गावर

हार्बर रेल्वे

कुठे - कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर

कधी - सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT