mumbai local megablock sakal
मुंबई

Mumbai Local News: मुंबईकरांना दिलासा! आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॅाक नाही

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप- डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप- डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे |The Thane to Kalyan up-down slow line of the Central Railway and the Kurla to Vashi up-down line on the Harbor line will have megablocks.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येत अनुयायांचा महासागर पाहायला मिळतो. मात्र, पश्चिम रेल्वे तर्फे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आलेला होता.

त्यामुळे आंबेडकरी जनतेची गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने रविवारी घेण्यात आलेल्या नियोजित मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे आंबडेकरी अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १४ एप्रिल २०२४ रोजी तिन्ही मार्गावर नियोजित मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप- डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप- डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चैत्यभूमी येथे बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी जनतेची मोठी गैरसोय होणार होती.

याकरिता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सदर मेगाब्लॉक रद्द करण्याची आग्रही मागणी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे केली होती. या पत्राची दखल घेत पश्चिम रेल्वेने रविवारी घेण्यात आलेल्या नियोजिती मेगाब्लॉक रद्द केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT