Mumbai Local Breaking: sakal
मुंबई

Mumbai Local News: ठाणे स्थानकात शनिवारी-रविवारी 'पॉवर ब्लॉक' !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local News: मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पादचारी पुलावर पाच मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी शनिवार-रविवार (ता. १४ आणि १५) मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे

ठाणे स्थानकाच्या फलाट क्र. १ आणि २ वर पाच मीटर रुंद पादचारी पूल उभारण्यात येत आहे. त्याच्यावर चार गर्डर ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारी रात्रकालिन वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे.

हा ब्लॉक मुलुंड ते कळवा डाऊन धीम्या मार्गावर शनिवार रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटण्याऱ्या डाऊन उपनगरीय लोकल मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. तसेच या लोकल ठाणे, कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर थांबतील.

शनिवारी (ता. १४) रात्री ब्लॉकच्या आधी सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी शेवटची लोकल रात्री ११.१६ वाजता असेल. ही लोकल टिटवाळ्याला मध्यरात्री एक वाजता पोहोचेल; तर ब्लॉकनंतर टिटवाळ्यासाठी पहिली लोकल विद्याविहार येथून ५.११ ला सुटेल आणि टिटवाळ्याला ६.२३ वाजता पोहोचेल. त्यानंतरच्या अन्य लोकल वेळापत्रकानुसार धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT