मुंबई

दादर, ठाण्यासह सहा स्टेशनवर आजपासून प्लॅटफॉर्म तिकीट बंद!

विराज भागवत

मुंबई: गेले काही दिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकल सेवा सुरू राहणार की बंद होणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. मिनी लॉकडाउन करूनही अद्याप कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबद्दल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, प्रवाशांवर निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तवली होती. त्याच अनुषंगाने आज मध्ये रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसोबत त्यांना सोडायला येणारी गर्दी भरपूर असते. ही गर्दी कमी करण्यासाठी सुरूवातीला प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर १० रूपयांवरून ५० रूपयांवर नेण्यात आला. पण गर्दी अपेक्षेइतकी कमी झाली नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वेकडून एक कठोर निर्णय घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, पनवेल, ठाणे, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या सहा स्टेशनांवर प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री बंद करण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे आता केवळ रेल्वेचे तिकीट असेल तरच स्टेशनच्या आत प्रवेश मिळणार आहे.

मुंबई विभागात कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. लोकल सेवेवर निर्बंध लावले जातील असे संकेत काल वडेट्टीवार यांनीही दिले. "लोकल सुरू करावी यासाठी आमच्यावर प्रचंड दबाव आणण्यात आला होता. कामगार आणि चाकरमान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून आपण लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण सध्या रेल्वेमध्ये पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे लोकल बंद करावी की मागच्या वेळेप्रमाणे लोकल सेवेबाबत काही निर्बंध लागू करावेत, याबद्दल आमचा विचार सुरू आहे", अशी माहिती वडेट्टीवार यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT