Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local: उत्सव विशेष ट्रेन्सचा मुंबईकरांना मनस्ताप; लोकल फेऱ्यांची काय आहे स्थिती? जाणून घ्या..

Chinmay Jagtap

Mumbai Local: दिवाळी आणि छटपूजेसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात येत असल्याने उपनगरी लोकल गाड्यांच्या वेळापत्रकाला फटका बसत आहे. यामुळे गुरुवारी दुपारी अप जलद मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले होते. विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना सामना करावा लागला आहे.

दिवाळी, छटपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा ४५० पेक्षा जास्त उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे विशेष गाड्यांमुळे रेल्वे मार्गावर अतिरिक्त भार येत आहे. तसेच, लांबपल्ल्याचा गाड्यांना मार्गिका उपलब्ध करून देत असल्याने जलद लोकल सेवांचा वेळापत्रकारवर परिणाम दिसून येत आहे.

परिणामी प्रवाशांना नाहक मनस्ताप होत आहे. गुरुवारी दुपारी जलद मार्गावरील अनेक लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. मेल-एक्स्प्रेससाठी ठाणे-दिवा स्वतंत्र मार्ग उपलब्ध होऊनही लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारला नसल्याचा अनुभव मध्य रेल्वेच्या प्रवाशांना येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT