mumbai local thane passengers stopped local train at kalwa station  
मुंबई

कळवा स्टेशनवर प्रवाशांचं आंदोलन, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर लोकल पुन्हा सुरू

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : कळवा कारशेड मधून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रवेश करायचा आणि कारशेडमधूनच सीट अडवून ठेवायची, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू होता, दरम्यान कारशेडमधून गाडी भरून येत असल्याने ठाण्यातील प्रवाशांची नेहमीची तक्रार आहे. आज, शुक्रवारी ही साधी लोकल वातानुकूलित करण्यात आली असल्याने कारशेडमध्ये बसून प्रवास करणाऱ्यांची पंचाईत झाली आणि प्रवाशांचा संताप अनावर झाला. त्यामुळे कळवा स्टेशन येथे संतप्त नागरिकांना कळवा स्टेशनवर एसी लोकल रोखून ठेवल्याचा प्रकार घडला.

कळवा-मुंब्रा हा राजकीय संवेदनशील भाग असल्याने जमाव जमा झाला. या लोकलसमोर मोठ्यासंख्येने प्रवासी एकत्र येऊ प्रवाशांनी ही लोकल रोखून धरल्याचा प्रकार समोर आला.

कळवा कारशेडमधून निघणाऱ्या लोकल ठाणे ते सीएसएमटी इथे जातात. दरम्यान कळव्यातील अनेक प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. ही लोकल आता एसी करण्यात आली आहे. त्यात आता कळव्यातील प्रवाशांना प्रवास करता येत नाही. आज कळव्यात प्रवाशांनी याप्रकरणी आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या प्रवाशांनी एसी लोकल रोखून धरली. अखेर आरपीएफ आणि जीआरपी यांच्या मदतीने आंदोलक प्रवाशांना ट्रॅकवरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर लोकलसेवा पूर्ववत सुरू झाली.

प्रवाशांचं म्हणाणं काय?

कळवा स्टेशनवरील प्रवाशांना ट्रेन मध्ये चढायला मिळत नाही म्हणून ते जिवावर उदार होऊन कारशेड मधून प्रवाशाला सुरुवात करतात आणि त्यावर कुरघोडीचे प्रयत्न म्हणून AC Train सुरू केली असे दिसते. गर्दीमुळे पडून मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी करण्याऐवजी वाढविण्याचे प्रयत्न AC केबीनमध्ये बसून रेल्वे प्रशासन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : तोंडावर हात ठेवून बोलला, रेफरीने करेक्ट 'कार्यक्रम' केला; Miguel Almiron सोबत विचित्र घडलं... Video Viral

Telegram Ban नंतर ॲक्सेससाठी लोकांनी शोधल्या नव्या ट्रिक्स; रॉकेटच्या वेगाने वाढले VPN डाऊनलोड, 'या' पद्धतीने सुरुय गैरवापर

Latest Marathi Live Updates: SIR कडे दुर्लक्ष करू नका- राज ठाकरे

Jalgaon: सोन्यात साडेचार, तर चांदीत १३ हजारांची घसरण; आयातीवरील शुल्क, युद्धबंद झाल्याचा परिणाम

FDA Action: तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, राज्यभरात धडाका; बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची कारवाई, औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT