mumbai sakal
मुंबई

Mumbai Local Train: लोकल खोळंबली; अंबरनाथ-बदलापूर दरम्यान तांत्रिक बिघाड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कल्याणवरून कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा सध्या उशीराने सुरू आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल सेवा उशीराने सुरू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विलंबाने सुरू आहे. मागच्या एका तासापासून ही वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे प्रवाशांना फटका बसला आहे.

(Mumbai Local Latest Updates)

दरम्यान, मागच्या अर्ध्या तासापासून डाऊनच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे उशीराने आहेत. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या माहितीनुसार या रेल्वेमधील तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला असून बॅकलॉगमुळे डाऊनच्या दिशेने जाणारी वाहतूक उशीराने होत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच धुक्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT