local train sakal
मुंबई

Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास ठप्प; प्रवाशांचा खोळंबा, ठाणे स्थानकात झाला होता बिघाड

संतोष कानडे

मुंबईः सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. पावणे दहा वाजल्यापासून रेल्वेसेवा ठप्प झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. कल्याण ते कुर्ला या दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणे स्थानकामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मुंबईकरांसाठी सकाळी दहाची वेळ ही धावपळीची असते. वेळेत कामावर पोहोचण्यासाठी सर्वजण घाई करत असतात. त्यातच मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला होता.

लोकल ट्रेन यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेने 'एक्स'द्वारे दिली. ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कल्याण ते कुर्ला स्थानकादरम्यान वाहतूक विस्कळीत झाली.

दरम्यान, पाऊण तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. सेंट्रल रेल्वेने पुन्हा एक ट्वीट करुन १० वाजून १५ मिनिटांनी रेल्वेसेवा सुरळीत झाल्याचं सांगितलं. मुंबई विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे ठाण्यातील बिघाड दुरुस्त झाला असून लोकल आणि मेल एक्स्प्रेस वाहतूक सुरु झाल्याने सेंट्रल रेल्वेने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Women Doctor : बहिणीसाठी शिक्षण सोडलं, वडिलांसोबत शेती करायचा भाऊ; कर्ज काढून MBBS केलं, एक महिन्यानंतर तिचा...

Laptop Repair Tips: लॅपटॉप खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आजपासूनच 'या' 10 चुका करणे टाळा

Latest Marathi News Live Update : अमरावतीच्या बडनेरामध्ये 27 वर्षीय उच्चशिक्षित युवतीची संशयास्पद आत्महत्या

Viral News : कामगाराने केला १.२४ कोटींच्या बांगड्यांचा चुराडा, पण त्यानंतर मालकाने जे केले ते वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Sangli Crime : सांगलीत खळबळ! ‘कृषी’ विभागातील शिपायावर तलवार हल्ला; गळ्याला फास लावला अन्

SCROLL FOR NEXT