mumbai local train Failure of signal system in wadala station railway traffic on harbor route  Sakal
मुंबई

Mumbai News : वडाळा स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड!

हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीची तीन तेरा : प्रवाशांचे प्रचंड हाल !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वडाळा रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणे ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर वाहतुकीचे तीन-तेरा वाजले. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावरून घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.११) संध्याकाळी ७.४१ वाजण्याच्या सुमारास वडाळा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सिग्नल यंत्रणा पुर्णपणे ठप्प पडली होती. त्यामुळे सीएसएमटी ते कुर्ला रेल्वे स्थानका दरम्यानची लोकल वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली.

परिणामी लोकलच्या एका मागोमाग एक रांगा लागल्याने गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे लोकल गाड्यामध्ये प्रवासी अडकून पडले होते. या घटनेची माहितीने मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले.

अवघ्या १५ मिनिटात सिग्नल बिघाड दुरुस्त करण्यात आलेला आहे. मात्र ही घटना पीक अवर्स मध्ये घडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहे. हार्बर लोकलमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांनी खाली उतरुन रुळामधून चालत जाऊन जवळचे स्थानक गाठत असल्याचे चित्रही दिसून आले आहे. विशेष म्हणजे घटनेमुळे हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा विलंबाने धावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT